शिवसेना (उबाठा) गटाचे निष्ठावंत तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुकाप्रमुख तथा माजी प्राचार्य प्रा. येताळा भगत यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संघटनक्षमतेवर, आमदार आवताडे यांच्या विकासाच्या राजकारणावर आणि अलोट जनआधारावर ठेवलेला विश्वास हीच या प्रवेशाची खरी ताकद आहे.
हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट विचारांचा शिवसैनिक म्हणून प्रा.भगत यांनी गेली अनेक दशके तालुक्यात उभा केलेले सर्वसमावेशक राजकारण आणि सलोख्याचे समाजकारण या त्यांच्या जमेच्या बाजू मंगळवेढा तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणखी भक्कम व व्यापक होण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतील याची नक्की खात्री आहे असा विश्वास आमदार आवताडे यांनी यावेळी व्यक्त करून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्या सर्व नवीन सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपा राज्य सदस्य राजेंद्र सुरवसे, युवक नेते सोमनाथ आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मोगले, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी शहराध्यक्ष नागेश डोंगरे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, तालुका उपाध्यक्ष अशोक माळी, युवक नेते बबलू सुतार, भाजपा तालुका सरचिटणीस सुशांत हजारे, भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष आदित्य हिंदुस्थानी, प्रहार संघटना तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल हजारे, शिवसेना शहर प्रमुख बंडोपंत चव्हाण, प्यारेलाल सुतार आदी मान्यवर सहकारी तसेच भाजपा व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.