मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
मंगळवेढा नगरपालिका निवडणूक अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ८ अर्ज असे एकण ९ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्या दिवशी मंगळवेढ्याचा आठवडी बाजार असल्याने वाजतगाजत अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दि.१० नोव्हेंबर पासून नगरपालिका पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत शुक्रवार अखेर १२ अर्ज दाखल झाला आहेत. शुक्रवारी दाखल झालेल्या अर्जामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक ५ मधून राजश्री राजकुमार चेळेकर यांनी प्रथमच अर्ज भरुन नगराध्यक्ष पदाला सलामी दिली आहे.
तर प्रभाग क्रमांक ८ मधून सर्वसाधारण महिला म्हणून शोभा हजारे (भाजप). प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण जागेसाठी समाधान हेंबाडे (भाजप), प्रभाग क्रमांक ५ सर्वसाधारण महिला म्हणून अनुपमा हजारे ( भाजप), प्रभाक क्रमांक ७ मधून सर्वसाधारण पदासाठी सोमनाथ माळी (अपक्ष),प्रभाग क्रमांक १० मधून सर्वसाधारण महिला पदासाठी सिमा बुरजे (अपक्ष), प्रभाग क्रमांक ३ मधून अनुजाती महिला निकीता खंदारे (अपक्ष), रेखा खंदारे (अपक्ष), प्रभाग क्रमांक १ संतोष नागणे (कॉग्रेस शरद पवार गट) आदी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान शुक्रवारी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी थोडी गर्दी केल्याने नगरपालिकेला निवडणूकीचे चित्र निर्माण झाले होते.