धडाकेबाज कारवाई,मंगळवेढा पोलिसांनी कर्कश सायलेन्सर ...फिरला बुलडोझर...

धडाकेबाज कारवाई,मंगळवेढा पोलिसांनी कर्कश सायलेन्सर ...फिरला बुलडोझर...

मंगळवेढा / प्रतिनिधी :- 

मंगळवेढा पोलिस स्टेशन वतीने ग्रामीण भागातील व शहरातील बुलेट, यामाहा, सुझुकी ई. गाड्यांच्या पुंगळ्या काढून तसेच कर्कश आवाजाच्या सायलेन्सरविरुद्ध मंगळवेढा वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री.बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय बोरिगिड्डे मार्गदर्शनाखाली मंगळवेढा शहरात विशेष ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान एकूण 15 मोटारसायकलस्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यापैकी 15 सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत. 

या कारवाईमध्ये मंगळवेढा पोलीस स्टेशन कडील पीएसआय श्री.विजय पिसे, श्री. नागेश बनकर तसेच वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार संभाजी यादव, पोकॉ.साळुंखे, पोकॉ.काळेल व पोलीस स्टेशन कडील कर्मचारी सहभागी झाले होते. 

 यापुढे ही पुंगळ्या काढून गाड्या फिरविणारे, सायलेन्सर मॉडीफाईड करून कर्ण-कर्कश आवाज काढणारे तसेच फटाक्यांचा आवाज काढणारे मोटारसायकलस्वारांवर विशेष लक्ष ठेवून ही कारवाई सुरूच राहणार आहे,असे पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय बोरीगीड्डे यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.