जिल्हा परिषदच्या व पंचायत समितीच्या मिळून 12 जागांसाठी 70 हुन अधिक जणांनी दिल्या मुलाखती...
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुका भाजप व महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी आवताडे सूतगिरणी वर आमदार समाधान आवताडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, उपनगराध्यक्ष येताळा भगत, नगरसेवक सोमनाथ आवताडे यांचे सह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारी संदर्भात त्यांचे व्हिजन विचारून मुलाखती घेतल्या.
भाजप महायुतीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी होती यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बारा जागांसाठी सत्तर हुन अधिक जणांनी मुलाखती देत तिकिटाची मागणी केली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून आले असले तरीही पंचायत समिती पेक्षा जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी ज्यादा रस असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
यामध्ये जिल्हा परिषद गट संत दामाजी नगर- 7,हुलजंती-5,भोसे -7,लक्ष्मी दहिवडी -8, तर पंचायत समिती गणसाठी संत दामाजी नगर -6,बोराळे -6,हुलजंती -4,मरवडे -7,भोसे -7,रेड्डे -6,संत चोखामेळा नगर- 3,लक्ष्मी दहिवडी -7 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
मुलाखतीनंतर आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की मुलाखती देणाऱ्या सर्वांना तिकीट देणे शक्य नसून निवड समिती जो उमेदवार जाहीर करेल त्या उमेदवाराला सर्वांनी निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून विकासाला हातभार लावावा कोणीही उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज न होता पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करावे राजकारणात मागेपुढे सरत जावे लागते.एकाच वेळी सर्वांना पद मिळणे अशक्य असते.प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक ना एक दिवस नक्कीच कदर केली जाते. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विजयासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले.