मंगळवेढ्यात पहिल्या दिवशी जिल्हा परिषद साठी ३२ तर पंचायत समितीसाठी १५ नामनिर्देशन पत्राची झाली विक्री...

मंगळवेढ्यात पहिल्या दिवशी जिल्हा परिषद साठी ३२ तर पंचायत समितीसाठी १५ नामनिर्देशन पत्राची झाली विक्री...

मंगळवेढा /प्रतिनिधी :- 

मंगळवेढा तालूक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकीची निवडणूक आयोगाने नुकतीच घोषणा केली असल्याने दि.१६ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी जिल्हा परिषद साठी ३२ व पचायत समिती साठी १५ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असल्याची माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांनी दिली.

निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या नियमाप्रमाणे दि.१६ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र पहिल्या दिवशी एक ही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही. या निवडणूक रिंगणात कोण कोण अर्ज भरणार याकडे तालुक्यातील तमाम मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

 उमेदवारी अर्ज भरण्याचा वार शुक्रवार हा शुभ असल्यामुळे नामनिर्देन फॉर्म घेण्यासाठी उमेदवारांनी पंचायत समितीत मोठी गर्दी केल्याचे चित्र होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.