आज सायंकाळी ४ वाजता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन - तहसीलदार मदन जाधव
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला काल शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
अर्ज भरताना उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आज शनिवार दि.17 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ४ गट व ८ गणांमध्ये सदर निवडणूक घेतली जाणार आहे. तरी सदर निवडणूकीसाठी नामनिर्दिशनपत्र प्रक्रिया दि.१६/०१/२०२६ ते २१/०१/२०२६ दरम्यान राबविली जाणार आहे.
योग्यरित्या नामनिर्देशन अर्ज भरण्याबाबत दि. दि.१७/०१/२०२६ रोजी संध्याकाळी ठीक ४.०० वाजता तहसील कार्यालय मंगळवेढा येथे मार्गदर्शन केले जाणार आहे.
तरी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार यांनी तहसील कार्यालयात, मंगळवेढा उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.