देवदर्शनासाठी आलेल्या क्लोझर गाडीला आयशर टेम्पोची जोराची धडक,चाैघांचा जागीच मृत्यू...

देवदर्शनासाठी आलेल्या क्लोझर गाडीला आयशर टेम्पोची जोराची धडक,चाैघांचा जागीच मृत्यू...

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

मंगळवेढा शहराजवळ अपघात होऊन चाैघांचा जागीच मृत्यू तर अनेक लहान मुलासह गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान वाहान चालक दारूचे सेवण करून वाहान चालवत आसल्याची माहीती समाेर आली आहे.

घटनास्थळी डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपुजे ,पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाेरीगीड्डे, घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

आयशर टेम्पोचा चालक दारूचे सेवन केलेल्या स्थितीत असल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे,हा आपघात मंगळवेढा -पंढरपूर राेडवरील शरदनगर येथे घडला आहे. वाहतुक शाखेच्या पोलिसांनी कालच एका दारू सेवन करून शहरातून आवजड़ वाहन घेऊन जाणाऱ्या चालकावर कारवाई करून २४ तास उलटन्याच्या आतच चालकाने दारूचे सेवन करून पुन्हा अपघात केल्याने चाैघांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे .

त्यामध्ये एक बालक ही गंभीर जखमी झाले असल्याची वृत्त आहे. बाहेरील कुटूंबिय पंढरपुरला देवदर्शनासाठी आले हाेते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.