जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती...
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
नुकतेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक कार्यक्रम कमी कालावधीत लागला आहे त्यामुळे मंगळवेढा तालुका भाजप व महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती उद्या गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी आवताडे सूतगिरणी वर होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे मुलाखती घेऊन पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत. त्यासाठी आमदार समाधान आवताडे हे स्वतः मुलाखती घेणार असून इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेवर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी 10 ते 11 दामाजी नगर, 11 ते 12 हुलजंती, 12 ते 1 भोसे, 1 ते 2 लक्ष्मी दहिवडी अशा गटनिहाय मुलाखती घेण्यात येणार असून त्या त्या वेळेत इच्छुक उमेदवारांनी आवताडे सूतगिरणीवरती हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.