मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटात रामचंद्र सलगर शेठ यांनी संत दामाजीनगर, ढवळस, धर्मगाव, मुढवी, उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी, माचणूर, तामदर्डी, बोराळे, तांडोर, सिद्धापूर, अरळी, नंदूर, डोणज, मुंढेवाडी, रहाटेवाडी या सर्व गावांत जाऊन लोकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा जाणून घेतल्या.
जिल्हा परिषद गटातून सर्व गावातून हा थेट संवादच त्यांच्याविषयीचा विश्वास अधिक दृढ करणारा ठरला.
जनतेचा प्रतिसाद बघून आज या गटातील वातावरण पाहता रामचंद्र सलगर शेठ यांचे नाव सर्वांत अग्रस्थानी असून, प्रत्येक गावातून त्यांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी जनता स्वयंस्फूर्तपणे त्यांच्या समर्थनासाठी पुढे येत आहे.स्थानिक नागरिकांच्या मनात ठाम विश्वास निर्माण झाला आहे की या वेळेस रामचंद्र सलगर शेठ निश्चितच विजयी ठरणार आहेत.
“निवडून आल्यानंतर विकास म्हणजे फक्त घोषणा नव्हे; प्रत्येक गावात प्रत्यक्षात काम करून दाखवणार, हे मी वचन देतो.” अशा प्रकारचे आश्वासन हे त्यांनी जनतेला दिले.
संत दामाजीनगर गटाच्या सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय रामचंद्र सलगर शेठ यांच्या नेतृत्वातून सुरू होणार, असा ठाम विश्वास आज सर्वत्र व्यक्त होत आहे. परिवर्तनाचा नवा अध्याय म्हणून आज जनता रामचंद्र सलगर शेठ यांच्याकडे पाहत आहे.ते येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये नक्कीच बदल घडवून आणतील यात तीळ मात्र शंका नाही असे तांडोर गावचे युवा नेते भगवंत मळगे यांनी विश्वास व्यक्त केला.