बेकायदा वाळू वाहतूक करणारे टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो महसूल पथक व पोलिस पथक यांनी पकडला, ५ जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल ; ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

बेकायदा वाळू वाहतूक करणारे टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो महसूल पथक व पोलिस पथक यांनी पकडला, ५ जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल 

 ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

मौजे धर्मगाव येथील माण नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करताना महसूल पथक व पोलिस पथक यांनी एक बिस्किट रंगाचे टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो त्यावरती आर.टी.ओ.नंबर नसलेला पकडून ३ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी आरोपी आकाश शंकर चौगुले (रा.शांतीनगर मंगळवेढा), विठ्ठल बिरा चौगुले (रा.शांतीनगर, मंगळवेढा), विशाल इरकर (रा. भाळवणी ता. मंगळवेढा), अनिकेत गायकवाड, महादेव इरकर या ५ जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,यातील फिर्यादी ग्राम महसूल अधिकारी महामूद वजुद्दीन काझी हे अन्य पोलीस पथक यांच्या मदतीने दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ००: ३० वाजता सुमारास मौजे धर्मगाव गावातील मान नदीपात्रात यातील आरोपी आकाश चौगुले ,विठ्ठल चौगुले रा.शांतीनगर ता.मंगळवेढा यांनी ४०७ टेम्पो मालक विशाल इरकर रा.भाळवणी ता. मंगळवेढा यांचे सांगणे वरून त्यांचे ताब्यातील एक बिस्किट रंगाचे टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो त्याचा आर.टी.ओ. नंबर नसलेला त्याचे हौदामध्ये अंदाजे ७ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू बेकायदेशीर रित्या, शासनाची रॉयल्टी न भरता मान नदीपात्रात चोरून भरत असताना मिळून आले.तसेच आरोपी अनिकेत गायकवाड व महादेव इरकर हे दोघे ४०७ टेम्पोमध्ये वाळू भरीत असताना आमची चाहूल लागल्याने पळून गेले होते.

सदर वाहन पाहता ते एक टाटा कंपनीचे ४०७ टेम्पो वाहन त्याचा आर टी ओ क्रमांक नसलेला होता. त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू असल्याची दिसली.त्याची अंदाचे ७ हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे एक बिस्किट रंगाचे टाटा कंपनीचे ४०७ टेम्पो असा एकूण ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

सदरची कारवाई मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे  व पथक यांनी संयुक्तरित्या केली.या प्रकरणी वरील सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२),३(५)पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९ व १५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तुकाराम कोळी करत आहेत.

मंगळवेढा महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या कडून मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू माफीयां विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.