पीव्हीसी पाईपने मारुन केले गंभीर जखमी, चौघाविरुध्द गुन्हा दाखल

पीव्हीसी पाईपने मारुन केले गंभीर जखमी, चौघाविरुध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा /प्रतिनिधी :- 

 तु माझ्या घरी का सांगीतले? तूला लय मस्ती आली आहे.असे म्हणून एका २० वर्षीय तरुणास पीव्हीसी पाईपने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी ऋतीक सुरेश काळुंखे (रा.शेलेवाडी) व अन्य अज्ञात तीन इसम यांच्या विरुध्द पोलीस गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील जखमी फिर्यादी अमर बाबासाहेब सावंत (वय २०,रा.शेलेवाडी) हा दि.९ रोजी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान मंगळवेढा ते सांगोला रोडवर असलेल्या कचरेवाडी ब्रीज जवळ पाठीमागील भांडणाचा राग मनात धरुन ऋतीक सुरेश काळुंखेव त्याचे सोबत असलेल्या तीन अनोळखी इसम यांनी संगनमत करुन तु माझ्या घरी का सांगीतले ? तुला लय मस्ती आली आहे. 
तूला बघतोच असे म्हणून पीव्हीसी पाईपने पाठीत, डोक्यावर, दोन्ही पायाच्या पींढरीवर,मांडीवर मारुन गंभीर जखमी करुन तुला आता सोडत नाही म्हणून दमदाटी करुन मोबाईल व खिशातील २ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.