जय मल्हार कला केंद्राच्या गोळीबार प्रकरणी तिघाना अटक,एक जण फरार

जय मल्हार कला केंद्राच्या गोळीबार प्रकरणी तिघांना अटक,एक जण फरार

मंगळवेढा /प्रतिनिधी :- 

टेंभूर्णी ता.माढा जवळील वेणेगाव हद्दीतील जय मल्हार लोकनाटय कला केंद्रात नाचगाण्याची एकत्रीत बैठक लावण्याच्या कारणावरुन बुधवारी १० रोजी च्या मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादातून एकावर गोळीबार झालेल्या घटनेत पायाला गोळी लागल्याने दादा कोठावले हा तरुण जखमी झाला होता.

याप्रकरणी टेंभुर्णी आणि परिसरात पसार झालेले आरोपी कोण यावरून चर्चा होत असताना टेंभुर्णी पोलिसांनी सोन्या उर्फ अविष्कार किशोर शिंदे वय २८ (राहणार नवीन सोलापूर रोड, कॉलेज समोर पंढरपूर), अभिषेक दादासाहेब इंगळे व २९ (राहणार शेगाव दुमाला हल्ली राहणार रामबाग पंढरपूर), सुरज उर्फ अंबानी दत्तात्रय पवार वय २३ (राहणार कोर्टी तालुका पंढरपूर) मधील या तिघा जणांना अटक करण्यात आली असून ज्ञानेश्वर उर्फ महाराज पांड्रंग कडलास्कर (राहणार व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, पंढरपूर) हा आरोपी फरार आहे. 

या चौघांपैकी गोळी कोणी झाडली आणि बंदुक कोणाकडून आणली याचा शोध पोलीसांकडून सरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

वेणेगाव, ता.माढा येथील जय मल्हार लोकनाटय कला केंद्रात नृत्यांगणांची नाच कामाची बैठक लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून वाखरी (ता. पंढरपूर) येथील देवा बाळू कोठावळे (वय २७ ) याचेवर गावठी बंदुकीने पायावर गोळी झाडली होती. या प्रकरणाने टेंभुर्णी आणि पंढरपूर परिसर हादरला होता. 

यामधील सर्व आरोपींची नावे समोर आलेली आहेत.यातील सुरज उर्फ अंबानी पवार- सोन्या उर्फ अविष्कार किशोर शिंदे,अभिषेक इंगळे या पंढरपूर तालुक्यातील तिघांना अटक करुन माढा न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातील सुरज वर ६ गून्हे व तडीपार कारवाई झालेली आहे. सोनू शिंदे यांचेवर २ गुन्हे दाखल आहेत. फरार असलेला कडलासकर वर ३ गुन्हे दाखल आहेत. तो ३०२ गुन्हा दाखल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.