मंगळवेढा / प्रतिनिधी :-
शिरसी येथे तुझा आम्हाला थांबविण्याचा काय संबंध आहे ? असे म्हणून एकाने लोखंडी रॉडने २३ वर्षीय तरुणाच्या डोकीत मारुन गंभीर जखमी करुन एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शारदा पांडुरंग खटकळे (रा.शिरसी ) ,रघूनाथ गायकवाड,बबन गायकवाड (रा.वाणीचिंचाळे),सचिन शिंदे (रा.वाकी घेरडी) आदी चौघाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी हर्षराज रावसाहेब खटकळे (वय २३,रा.शिरसी) हे दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता गावातील चौकात फिर्यादीचा भाऊ सुयश याचेसोबत शारदा खटकळे यांनी केलेला वाद मिटवून घेवू असे म्हणून त्यांना गावात बोलावून घेतले व आरोपी मारण्यासाठी पाठीमागे पळत असताना फिर्यादीने त्यांना थांबविले असता तुझा आम्हाला थांबविण्याचा काय संबंध आहे ? असे म्हणन फिर्यादीच्या डोकीत रॉडने मारुन गंभीर जखमी केले व एका महिले केस धरुन खाली पाडून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निंबाळकर हे करीत आहेत.