भाजपा आमदार समाधान आवताडे यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपाकडून इच्छुक उमेदवारांनी लावली हजेरी

भाजपा आमदार समाधान आवताडे यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 

मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपाकडून इच्छुक उमेदवारांनी लावली हजेरी 

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

मंगळवेढा येथील आमदार जनसंपर्क कार्यालय दालनात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे साहेब यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासमवेत सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
या मुलाखतींच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची कामगिरी, जनसंपर्क, आणि पक्षनिष्ठेचा आढावा घेण्यात आला.भारतीय जनता पार्टीचे बळ अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे विजय सुनिश्चित करण्यासाठी ही मुलाखत प्रक्रिया पार पडली.
याप्रसंगी नगरपरिषद निवडणूक प्रभारी राजेंद्र सुरवसे, युवक नेते सोमनाथ आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मोगले, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे तसेच इतर पदाधिकारी व इच्छुक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.