आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून मारापूर मंडलमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई - सरपंच विनायक यादव

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून मारापूर मंडलमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई - सरपंच विनायक यादव

मंगळवेढा / प्रतिनिधी :- 

सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या मारापूर मंडल मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून भरपाई मिळणार असल्याची माहिती मारापुर गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी दिली आहे. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असल्याने हजारो शेतकऱ्यांची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक गावांना भेट देऊन बाधित शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला होता.त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांची वेदना जाणून घेतली होती.

यावेळी शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाशी थेट संपर्क साधून पंचनामे करण्याचे आदेशही दिले होते.तसेच, शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी व त्यांच्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी आहे, आणि त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे स्पष्ट केल होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.