मंगळवेढा /प्रतिनिधी :-
संत दामाजीनगर गटातून दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच आता ओबीसी उमेदवाराचा चेहरा समोर आला आहे. धर्मगावचे माजी सरपंच रामचंद्र सलगर शेठ यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ढवळस गावचे युवा उद्योजक रवींद्र हेंबाडे यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे केली आहे.
दामाजीनगर गटातून एकमेव ओबीसी चेहरा समोर आल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
माजी सरपंच रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी आमदार समाधान आवताडे यांनी जवळपास निश्चित करावी.विकास काय असतो तो गटातील प्रत्येक गावाला समजेल असा विश्वास ढवळसचे युवा उद्योजक रवींद्र हेंबाडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
रामचंद्र सलगर शेठ यांनी आत्तापर्यंत गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. गोरगरीब जनतेसाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट कुटुंबांना मिळवून देण्याचे काम त्यांनी पार पाडले आहे.
माजी सरपंच रामचंद्र सलगर शेठ यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची बँकेत ठेव ठेवली आहे.आतापर्यंत त्यानी असंख्य कामे आपल्या जिल्हा परिषद गटातून मार्गी लावली आहेत. त्या जोरावर निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
ओबीसी गटातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांना विविध संघटनेचा मोठा पाठिंबा ही मिळेल. येत्या काही दिवसात आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.