मंगळवेढा /प्रतिनिधी :-
आयुष्यमान आरोग्यमंदिर हुलजंती ता.मंगळवेढा येथे शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू (एलएलपी) मंगळवेढा डॉक्टर प्रीती शरद शिर्के यांच्यावतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार व गरोदर माता तपासणी, बाल सुरक्षा अंतर्गत पोषण आहाराबद्दल मार्गदर्शन अभियान अंतर्गत हुलजंती पंचक्रोशीतील जवळपास 100 महिलांची तपासणी आज शनिवार दि 20 सप्टेंबर रोजी करून उपचारसेवा देण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर प्रीती शरद शिर्के यांच्या हस्ते संपन्न झाले.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शासनाच्या वतीने सुरू असलेले अभियान महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून या आरोग्य अभियानाचा महिलांनी आवश्य लाभ घ्यावा, विशेषतः महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, स्थानिक व क्षेत्रीय आहाराला आपण प्राधान्य द्यावे, गरोदर आणि स्तनदा मातासाठी तसेच लहान बाळासाठी योग्य आहार असावे, मासिक पाळी स्वच्छता व पोषण आहार याकडे विशेष लक्ष द्यावे, वेळेत आरोग्य उपचार घेऊन आपण सदृढ असावे, गरोदर मातांनी काळजी घ्यावी, असे मत यावेळी डॉक्टर प्रिती शिर्के यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी रक्तदाब,मधुमेह तपासणी,स्तन व गर्भाशय, मूख व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी करून उपचार करण्यात आले.
यावेळी सलगर बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गायकवाड, डॉक्टर संजय कांबळे, आरोग्य निरीक्षक बाबुराव माने, आरोग्य निरीक्षक सरसंबी बी एस, चिदानंद गुरव, समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती स्वाती बडीगेर, आरोग्य सेवक लक्ष्मण कुरुडे, आरोग्य सेविका एस एच बिराजदार, महालॅबचे शंकर गायकवाड यांच्यासह हुलजंती उपकेंद्राचे आशा कर्मचारी, अर्धवेळ परिचर यांच्यासह अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.