मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित करा पंचनामे ; भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन...

मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित करा पंचनामे...

भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..

मंगळवेढा / प्रतिनिधी :- 

मंगळवेढा तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या सतत धार पावसामुळे तालुक्यातील सर्व कृषी मंडलांमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. यामध्ये तूर सोयाबीन, मका,कांदा उडीद बाजरी मका, मटकी आदी पिकांचे नुकसान झाले आहे तसेच डाळिंब केळी व द्राक्ष या फळपिकांचे व बागांचे नुकसान झाले आहे.या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे.

 तरी शासनाने त्वरित पंचनामे करून सरसकट कमीत कमी निकष लावून नुकसान भरपाई द्यावी अशा आशयाचे निवेदन भाजपा शहर व ग्रामीण च्या वतीने आज तहसीलदार मदन जाधव यांना देण्यात आले.

 यावेळी मा भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी तहसीलदारांना लवकरात लवकर पंचनामे सुरू करण्याचे सूचना दिल्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसे नुकसान भरपाईत समाविष्ट करता येईल याबद्दल चर्चा केली निवेदन देता वेळी ग्रामीण व शहरांमधील मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

 यामध्ये भाजपा शहर अध्यक्ष नागेश डोंगरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, सरचिटणीस सुशांत हजारे व विश्वास चव्हाण,उपाध्यक्ष संजय माळी व आनंद मुडे, उमेश विभुते धर्मगाव ,चिटणीस विकास क्षीरसागर व वासुदेव जोशी, अशोक आसबे,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष आशाताई पाटील , किसान मोर्चा अध्यक्ष अण्णासाहेब पुजारी ब्रह्मपुरी,युवा मोर्चाचे आजित लेंडवे,कामगार आघाडीचे आदित्य हिंदुस्तानी, युवा मोर्चा रणजीत सिंह गवळी स्वप्निल गवळी,सचिन गवळी विनोद दत्तू,तानाजी जगदाळे इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.