अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
शिवणगी येथे पत्राशेडमध्ये बांधलेल्या ७५ हजार रुपये किमतीच्या ८ शेळया चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी लक्ष्मण कांबळे रा.शिवणगी हे पशूपालक असून त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.दि.१४ रोजी घराच्या शंभर फूट अंतरावर असलेल्या पत्राशेडमध्ये ७० हजार रुपये किमतीच्या ७ शेळया व ५ हजार रुपये किमतीची १ पाट अशा एकूण ७५ हजार रुपये किंमतीच्या शेळया तेथे बांधल्या होत्या.दि.१४ रोजी मध्यरात्री १:३० वाजता शेळयांचा ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी हे झोपेतून उठून अंधारातून धावत पत्राशेडजवळ आले असता , सदर शेळया पत्राशेडमध्ये दिसून आल्या नसल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी आजू बाजूला शेळयांचा शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.
शेळया कोणी तरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या असल्याचे फिर्यादीस खात्री झाल्याने अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.