मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात नादुरुस्त वितरण पेट्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता तसेच शहरातील पेट्या रस्त्यालगत गर्दीच्या ठिकाणी असले कारणाने अपघात देखील होण्याची शक्यता लक्षात घेता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी ऊर्जाराज्यंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या मागणीनुसार शहरातील नादुरुस्त 52 वितरण पेट्या तात्काळ दुरुस्ती करण्यात आलेल्या असून ग्रामीण भागातील 213 डी पी वितरण पेट्या दुरुस्त केल्या जाणार आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील वीज वितरण कामाच्या प्रश्नासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांचे समवेत सर्व अधिकारी यांची बैठक नुकतीच आ समाधान आवताडे यांनी आयोजित केली होती.
त्यामध्ये मंगळवेढा,पंढरपूर तालुक्यातील वीजेच्या अनेक प्रश्नासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानुसार येथील महावितरणच्याअधिकाऱ्याकडून कामे मार्गी लागताना दिसत आहे. येथील शहरातील अनेक ठिकाणचे डी पी च्या वितरण पेट्या खराब झाल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता तसेच अनेक ठिकाणी पेट्या उघड्या असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती, ही बाब लक्षात घेता ह्या पेट्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती त्यानुसार शहरातील 52 पेट्या नव्याने करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील नादुरुस्ती वितरण पेट्या दुरुस्त करण्यासाठी देखील आमदार आवताडे यांनी अधीक्षक अभियंता सोलापूर व कार्यकारी अभियंता पंढरपूर यांना सूचित केलेअसून यामध्ये नादुरुस्त असणाऱ्या 213 डिपी च्या वितरण पेट्या दुरुस्त करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील देखील विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
यामुळे महावितरण ची अनेक दिवसापासूनची वितरण पेट्या दुरुस्तीची ग्राहकांची मागणी पूर्ण होताना दिसत असून शहरात सर्वत्र दुरुस्त केलेल्या, रंगरंगोटी केलेल्या पेट्या दिसू लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.