उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी डिजे व डॉल्बी धारकांना दिला कडक कारवाईचा इशारा...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात आगामी काळात येणान्या नवरात्र महोत्सवाच्या पार्वभूमीवर मंगळवेढा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली.
दरम्यान, या बैठकीत गणेशोत्सव कालावधीत अनुक्रमे एक, दोन, तीन क्रमांक मिळविलेल्या मंडळांचा पारितोषिक वितरण कार्यक्रमही संपन्न झाला.
.
दि.२२ सप्टेंबरपासून नवरात्र महोत्सवास सर्वत्र सुरुवात होत असल्याने तसेच मंगळवेढयात नवरात्र महोत्सव मोठया प्रमाणात प्रतिवर्षी साजरा केला जातो. या पार्श्वभमीवर हा उत्सव शांततेत पार पडावा या उद्देशाने पोलिस प्रशासनाने सोमवार दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता नवरात्र महोत्सव उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची व शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी डी.वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपुजे म्हणाले , गणेश उत्सव कालावधीत कुठेही डॉल्बी वाजविला गेला नाही. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवातही त्याचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या.सध्या डॉल्बीच्या आवाजामुळे राज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.या घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी डॉल्बीमुक्तचा महत्वकांशी निर्णय घेतला होता.या निर्णयाचे सर्वत्र मोठया उत्साहात स्वागतही करण्यात आले.गणेशोत्सव कालावधीत ज्या मंडळांनी सर्व नियमांचे पालन करून उत्सव साजरा केला.
त्यामध्ये जवान गणेशोत्सव मंडळ, गुंगे गल्ली- प्रथम, श्री माऊली गणेशोत्सव मंडळ, नंदेश्वर - व्दितीय, वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ, नागणेवाडी - तृतीय असे कमिटीने तीन क्रमांक निवडून त्यांना ट्रॉफी, पुष्पुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, नायब तहसिलदार शूभांगी जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद लातूरकर, पोलिस उपनिरिक्षक विजय पिसे, नागेश बनकर, गोपनीय विभागाचे पोलिस हवालदार दिगंबर गेजगे, तसेच पुरुष व महिला पोलिस कर्मचारी त्याचबरोबर गावचे पोलिस पाटील, विविध मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे अध्यक्ष, मोहल्ला कमिटीचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.