५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
मौजे लेंडवे चिंचाळे गावातील लेंडवे चिंचाळे ते फराटे वस्ती जाणारे रोडवरील अजय घोडके यांचे घराचे जवळ रोडवर बेकायदेशीर वाळू वाहतूक करीत असताना मिळून आला. सदर एक केशरी रंगाचे टाटा कंपनीचा टिपर पकडून ५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी आरोपी वैभव दामोदर गायकवाड,वय-३४ (रा.कडलास ता.सांगोला) याच्या विरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,मौजे लेंडवे चिंचाळे गावातील लेंडवे चिंचाळे ते फराटे वस्ती जाणारे रोडवरील अजय घोडके यांचे घराचे जवळ रोडवर यातील आरोपी वैभव दामोदर गायकवाड,वय-३४ (रा.कडलास ता.सांगोला) त्यांचे ताब्यातील एक केशरी रंगाचे टाटा कंपनीचा टिपरच्या हौदामध्ये अंदाजे १५ हजार रुपये किमतीची २.५ ब्रास वाळू बेकायदेशीर रित्या, शासनाची रॉयल्टी न भरता वाहतूक करीत असताना मिळून आला आहे.
सदर वाहन पाहता ते एक केशरी रंगाचा टाटा कंपनीचा टिपर वाहन त्यामध्ये अंदाजे २.५ ब्रास वाळू असल्याची दिसली.त्याची अंदाचे १५ हजार रुपये किंमतीची २.५ ब्रास वाळू ५ लाख रुपये किमतीचे २.५ एक केशरी रंगाचे टाटा कंपनीचा टिपर असा एकूण ५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी सदर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२)पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९ ,१५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.नागेश निंबाळकर करत आहेत.
मंगळवेढा पोलिस स्टेशन कडून मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू माफीयां विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.