तहसील कार्यालय मंगळवेढा येथे 19 सप्टेंबर रोजी 'रस्ता अदालत' - तहसीलदार मदन जाधव

तहसील कार्यालय मंगळवेढा येथे 19 सप्टेंबर रोजी 'रस्ता अदालत' - तहसीलदार मदन जाधव 

मंगळवेढा / प्रतिनिधी : - 

मंगळवेढा तालुक्यात दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविला जात असून यातीलच एक उपक्रम म्हणून तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 19 रोजी 'रस्ता अदालत' आयोजित करण्यात आली आहे.

"सेवा पंधरवडा" अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत एकूण 583 रस्त्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्याचे सीमांकन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याचबरोबर तहसील कार्यालयात ज्यांचे मामलतदार कोर्ट ऍक्ट कलम 5 अंतर्गत रस्ता अडविल्याची प्रकरणे व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम मधील कलम 143 अंतर्गत नवीन रस्ता मागणी संदर्भात जी प्रकरणे सुनावणीवर आहेत. या प्रकरणात सुद्धा अर्जदार, गैरअर्जदार तसेच दोन्ही पक्षाचे विधिज्ञ यांच्या माध्यमातून प्रकरणात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सदरची रस्ता अदालत शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 

या रस्ता अदालत मध्ये शेत रस्ता, शिव रस्ता, पाणंद रस्ता बाबतचे वाद आपसी सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

तरी ज्यांचा रस्त्याविषयी वाद असेल त्यांनी रस्ता अदालत मध्ये सहभाग घेऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.