मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील ग्रामसेवक यांना शिवीगाळ व दमदाटी प्रकरणी; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दत्तात्रय उर्फ संजय किसन राठोड (रा.बालाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,बालाजीनगर लमानतांडा लोकसेवक ग्रामसेवक श्रीकांत मधुकर ठेंगील यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली.हा प्रकार १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:१५ वाजण्याच्या सुमारास बालाजीनगर ग्रामपंचायत समोर रोडवर घडली.
बालाजीनगर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन लाभार्थी यांचे गावातील घरकुलाची पाहणी करून कार्यालय मध्ये येत असताना आरोपी याने लोकसेवक फिर्यादी यांना "तू माझा फोन का घेत नाही, तू मला न विचारता ग्रामसभा का घेतली" असे म्हणून लोकसेवक हे त्यांचे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना अडथळा आणून शिवीगाळ करून दमदाटी करत हाताने धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो.हे.कॉ. योगेश नवले हे करीत आहेत.