मंगळवेढा (प्रतिनिधी) : -
समाजातील विविध ज्वलंत विषयांवर आपल्या मार्मिक शब्दांनी भाष्य करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचे 'बाप समजून घेताना'.. या विषयावर इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता व्याख्यान होणार आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, संस्थेच्या अकॅडमिक ऑडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम, सचिव प्रियदर्शनी महाडिक, संचालिका व उपप्राचार्या प्रा.तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका अजिता भोसले, संचालक यतिराज वाकळे, राम नेहरवे, ऑड.शिवाजी पाटील, दलितमित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र गायकवाड, दलितमित्र कदम गुरुजी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव, इंग्लिश स्क्ल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सूनील नागणे, पर्यवेक्षक सुहास माने, लता ओमणे, अशपाक काझी तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रा.वसंत हंकारे यांचे विचार हे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी आहेत त्यामुळे या व्याख्यानासाठी शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित दलितमित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय, दलितमित्र कदम गुरुजी फार्मसी कॉलेज, इंग्लिश स्कूल माध्यमिक व ज्यूनिअर कॉलेज, शिवतेज प्राथमिक शाळा तसेच मंगळवेढा शहरातील इतर शाळांमधील विद्यार्थी तसेच पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज मंगळवेढा या प्रशालेचे प्राचार्य रवींद्र काशीद यांनी केले आहे.