मंगळवेढा/प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील पोलीस पाटील हे सध्या चांगलेच प्रकरण गाजत आहेत.मौजे लमाणतांडा येथील पोलीस पाटील यांचे अनेक करारनामे उजेडात प्रहारणे आणले आहेत त्या पोलीस पाटलांनी बोगस डॉक्टर की करत होता हे संपूर्ण डोणज ,नंदुर ,कात्राळ ,कर्जाळ,लमाणतांडा या गावातील नागरिकांना माहिती असूनही हे प्रकरण दाबले. यावर प्रहार शांत बसला नाही त्या पोलीस पाटलाचे दारू धंदे सुरू आहेत हे कळविले त्याने ते माझे नाहीत म्हणून उडवून लावले नंतर तो स्वतः मन्ना नावाचा जुगार चालवत असलेला व्हिडिओ मंगळवेढा पोलीस स्टेशनला पाठविला त्यातही त्याने मी पैशावर खेळत नाही असा जबाब देऊन पळवाट काढली. पोलिसांनी पोलीस पाटील सोडला पण त्यांच्यावर भांडणे मारामारी असे अनेक प्रकारे गुन्हे आहेत तरीही तो पोलीस पाटील कसा असा प्रश्न थेट प्रांताधिकारी साहेबांना प्रहारणे विचारला आहे.
पण जे पोलीस अधिकारी या पोलीस पाटील यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांच्यावरही प्रहार आवाज उठवणार आहे कारण चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम मंगळवेढा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी करीत आहेत.हे स्पष्ट दिसून आले आहे त्यामुळे आता लमाणतांडा चे पोलीस पाटील हे मोठ्या संकटात सापडले आहेत तर दुसरीकडे भालेवाडी चे पोलीस पाटील यांची यांनी तर अजब गावची गजब कहानी अशी कथाच लिहिली आहे यांनी थेट शासनाची फसवणूक करत ठेकेदार बनला आहे. यांनी पोलीस पदाचा राजीनामा देऊन ठेकेदारी हा व्यवसाय करायचा पण त्यांनी दोन्ही व्यवसाय सुरू केली आहेत. त्यांनी मारोळी येथे प्लेविंग ब्लॉक बसविणे, गाव अंतर्गत सीसीची कामे करणे, लघुनळ पाणीपुरवठा करणे, शौचालय बांधणे ,रस्ते करणे अशी अनेक छोटी मोठी कामे अनेक वर्षे झाली तो करीत आहे.त्यामुळे याचीही हकालपट्टी करणे गरजेचे आहे. पोलीस पाटील पदावर ती असताना कोणत्याही निवडणुकीत भाग घ्यायचा नसतो पण हे दोघेही जणू स्वता निवडणूक लढवीत आहोत असे म्हणून भाग घेत असतात त्यामुळे या दोघांचीही गैरवर्तणूक सिद्ध झाली आहे.त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी प्रहार ने आता रीतसर मागणी केली आहे त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील २९ पोलीस पाटील हे प्रहारच्या रडारवर आहेत असेही मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले.
यावेळी निवेदन देतेवेळी प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे ,सचिन सरवदे, अण्णासो पाटील ,रोहिदास कांबळे उपस्थित होते.कारवाई न झाल्यास शासनाला जागेवर आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करू असा इशारा प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले आहे.