पाठखळ येथील त्या दीर व भावजयीच्या प्रकरणात न्यायालयाने दोघांना पण २५ तारखेपर्यंत वाढवली पोलीस कोठडी
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथील भावजयशी असलेल्या प्रेमसंबंधातून चुलत भावानेच कट रचून अनोळखी व्यक्तीला जाळल्या प्रकरणात दीर व भावजय या दोघांना न्यायालयाने २५ तारखेपर्यत पोलीस कोठडी वाढवली आहे.
पोलिसांनी कोर्टामध्ये मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा डीएनए तपासणी करिता पाठवायचा आहे. आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणाची मदत घेतली आहे का ? याचा तपास करावयाचा आहे.
आरोपीने मयताचा मृत्यु देह कोठे कोठे ठेवला त्या ठिकाणी चा साक्षीदार कोण असेल तर त्याचा तपास करावयाचा आहे. आरोपीने कुठले वाहन वापरले त्याबाबत तपास करावयाचा आहे. आरोपीस कोणी मदत केली आहे का याबाबत तपास करावाच आहे. या कारणास्तव पोलीस कस्टडी वाढवण्या बाबत मागणी केली.सरकार पक्षातर्फे अँड. अमोल क्षीरसागर यांनी काम पाहिले.
आरोपी तर्फे अँड.संताजी माने यांनी,आरोपींना यापूर्वी पाच दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे त्यामध्ये बराचसा तपास झालेला आहे.
त्यामुळे आता पोलीस कस्टडी देण्याची आवश्यकता नाही जरूर तर कमीत कमी व पोलीस कस्टडी देण्यात यावी असा युक्तिवाद केला. आरोपीतर्फे अँड.संताजी माने व अँड.सागर टाकणे यांनी काम पाहिले.