आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून नूतन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी ७५ लाख निधी मंजूर, आ आवताडे यांच्या माध्यमातून गाव-खेड्यातील प्रशासकीय भवनांच्या वैभवात मोठी भर पडणार

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून नूतन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी ७५ लाख निधी मंजूर 

आ आवताडे यांच्या माध्यमातून गाव-खेड्यातील प्रशासकीय भवनांच्या वैभवात मोठी भर पडणार 

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या वार्षिक आराखड्यानुसार मतदारसंघामध्ये नूतन ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ७५ लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्याकडून देण्यात आली आहे. सदर निधीतून मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर, हुलजंती व निंबोणी या तीन गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी प्रत्येकी २५ लाख निधी मंजूर आहे.

गाव-खेड्यातील स्थानिक नागरिकांच्या विकासाचे आणि शासकीय कामकाजाचे मुख प्रशासकीय भवन म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय असते. गावातील मूलभूत आणि पायाभूत सोयी-सुविधांची पूर्तता होण्यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन नियोजित ग्रामपंचायत कार्यालयाचा गुणात्मक आणि दर्जात्मक बांधकाम आराखडा तयार होऊन प्रशस्त व सुसज्ज ग्रामपंचायत भवन उभारणीसाठी मोठी या निधीमुळे मोठे अर्थसहाय्य मिळणार आहे.

ग्रामपंचायत संस्थांच्या तांत्रिक व कागदपत्रे समस्या आणि इतर अडी-अडचणी अनुषंगाने संबंधित गावातील ग्रामसेवक
 व इतर ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सदर बांधकामा संदर्भात आवश्यक कागदपत्रे व इतर बाबींची लवकरात लवकर आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्याकडे पूर्तता करावी असेही सांगण्यात आले आहे.

चौकट- 
आमच्या नंदेश्वर व इतर दोन गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी मंजूर झालेल्या वरील भरीव निधीमुळे गावगाड्यातील नागरिकांचे प्रशासन केंद्र असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयांचे देखणं रूप ग्रामपंचायत कारभारात मोठी क्रांती घडवून आणणार आहे. आमदार समाधान आवताडे यांनी ठेवलेल्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे मतदार संघात अक्षरशः निधीचा पाऊस पडत आहे.

- दत्तात्रय साबणे, सामाजिक कार्यकर्ते, नंदेश्वर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.