पाच जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे पाठीमागील भांडणाचा राग मनात धरुन आकाश अशोक काकडे ,वय २५ या हॉटेल मँनेजरला जबरदस्तीने मोटर सायकलवर बसवून माळरानावरील गदयागाढव येथे नेवून अंगावरील कपडे काढून हातपाय बांधून रुमालाचा बोळा तोंडात कोंबून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी जकराया मासाळ,गंगाराम शेजाळ, जीवन मोटे (रा.नंदेश्वर).कुंडलिक मासाळ, समाधान मासाळ (रा.गोणेवाडी) या पाचजणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी ,यातील जखमी फिर्यादी तथा हॉटेल मॅनेजर आकाश अशोक काकडे (रा.काकडे वस्ती, भोसे) हे दि१८ जुलै रोजी रात्री ९ वाजता भोसे येथील स्वराज्य हॉटेल मध्ये काऊंटरवर बसले असता पाठीमागील भांडणाचा राग मनात धरुन वरील आरोपींनी मोटर सायकलवर येवून फिर्यादीस जबरदस्तीने बसवून माळरानावरील गद्यागाढव येथे नेवून फिर्यादीच्या अंगावरील कपडे काढून त्याच कपड्याने हातपाय बांधले, तसेच रुमालाचा बोळा तोंडात कोंबून आरोपींनी प्लास्टिकच्या पाईपने पाठीवर,पोटावर, हातावर, पायावर, डोकीत मारुन गंभीर जखमी केले.
पोलीसात तक्रार केली तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.