मुलीच्या जन्माची आठवण म्हणून अंगणात एक झाड लावून वृक्षारोपण संकल्पना
मंगळवेढा/प्रतिनिधी:-
मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणारा छळ, नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार, मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी पाहतो. पण सध्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील तांडोर सारख्या ग्रामीण भागात वडील विजयकुमार कल्लाप्पा मळगे व मळगे कुटुंबियांनी त्यांच्या जन्मलेल्या मुलीचे व आई भाग्यश्री चा आकर्षक सजावट करून फटाक्यांच्या आतषबाजीत, वाजत- गाजत घरामध्ये व परिसरात फुलांनी, कळ्यानी, पाकळ्यांनी अंगणात आकर्षक सजावट करत घराभोवती फुगे फुगावून झाडांना बांधून अतिशय सुंदर आनंदमय वातावरण तयार करून जणू काय झाडेच आनंदाने स्वागत करत आहेत असे निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले होते.सर्वानी मिळून मुलीचे औक्षण करीत कुटुबातील सर्वाना पेढे वाटून धुमधडाक्यात स्वागत करून गृहप्रवेश करण्यात आला.यावेळी अबाल,वृद्ध,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलीच्या जन्माने आनंदाने वडील व आई या दोघांनी घरासमोर झाड लावून वृक्षारोपण करून मुलीच्या जन्माची आठवण म्हणून झाड लावले.समाजात अनोखा उपक्रम राबवून स्वागत करण्यात आले.
मळगे कुटुंबाने या अगोदर त्यांच्या दोन्ही ही मुलीचे अश्याच प्रकारे स्वागत केले होते.पहिली मुलगी आराध्या,दुसरी मुलगी आरोही व आता ही तिसरी मुलीच्या जन्माने खचून न जाता अगदी तश्याच प्रकारे जल्लोषात,अति उत्साहात स्वागत करण्यात आले. यामुळे त्यांच्या या अनोख्या पद्धतीने मुलीच्या स्वागताची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
महिला सर्व क्षेत्रांत कशा आघाडीवर आहेत हे सर्व जगाला माहित आहे.स्त्री भ्रूणहत्येप्रमाण वाढल्याने स्त्र-पुरुष जन्मदरात कमालीची तफावत निर्माण झाली आहे. परिणामी, आज लग्नाला मुली मिळत नाही. मी भाग्यवान आहे की माझ्या घरात माझ्या लक्ष्मी आली. मी माझ्या तिसऱ्या मुलीचे ही आनंदाने स्वागत केले. मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मूल आहे हे लक्षात घेऊन वाढवा असा विचार रुजवण्यासाठी नेटाने प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन मुलीचे वडिल विजयकुमार मळगे यांनी सांगितले.