राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदावर ॲड.कु.वृषाली पांडुरंग इंगळे- पाटील यांची निवड

राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदावर ॲड.कु.वृषाली पांडुरंग इंगळे पाटील यांची निवड


मंगळवेढा/ प्रतिनिधी :- 

राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार व प्रांताध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदावर ॲड.कु.वृषाली पांडुरंग इंगळे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशच्या चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र नुकतेच त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते देण्यात आले. पक्षाशी राखलेली एकनिष्ठता व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य पोचवण्याच्या केलेल्या कामाच्या प्रयत्नांची पोचपावती म्हणून पक्षाने त्यांना ही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पदापर्यंत देण्याची संधी अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 
 सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्या एक शिवव्याख्यात्या आहेत.शिव, शाहू ,फुले, आंबेडकर या विषयांवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनीही विचारधारा आपल्या व्याख्याना द्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

 त्यांनी पक्षाच्या प्रवक्ता ,जिल्हाध्यक्ष या पदावर कार्य केले आहे. त्या सध्या वकील असून वकील क्षेत्रामध्ये जनतेचे कल्याण हा पहिला कायदा आहे असे विचारधारा ठेवून काम करत आहे. युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला नवले , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे या सर्वांचे सहकार्य असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.