(मंगळवेढ्यात श्री दामाजी महाविद्यालयात नशामुक्त अभियान)
मंगळवेढा/प्रतिनिधी:-
शालेय व महाविद्यालयीन जीवनात मुलांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे मत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारचे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी व्यक्त केले ते श्री संत दामाजी महाविद्यालयात आयोजित केलेल्या नशा मुक्त भारत अभियानात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य राजेंद्र गायकवाड उपस्थित होते.
महेश वैद्य पुढे म्हणाले आज वाढती व्यसनाधिनता ही फार मोठी समस्या निर्माण झालेली असुन डॉ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील नशा मुक्त भारत साकारण्याचे स्वप्न मुलांनी साकारणे गरजेचे आहे. संत परंपरेपासून नशा मुक्तीचे संदेश देणारे अनेक अभंग संतांनी आपल्या अभंगातून लिहिले आहेत. त्याचे संस्कार पालकांनी आपल्या मुलांच्या वरती करून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. आज मुलांचे स्टिंग आणि उत्तेजित कोल्ड्रिंक्स पिण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यावरती निर्बंध आणण्यासाठी पालकाची आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची असणार आहे. मुले ही फुले असतात असे आपण म्हणतो त्या फुलाला पालकांनी तसेच शिक्षकांनी व्यवस्थित रित्या खत पाणी घालून म्हणजेच चांगले संस्कार करून फुलविले तरच भारत सरकारच्या सुरु असलेल्या नशा मुक्त भारत अभियानात सकारात्मक बदल घडतील.
विद्यार्थ्यांनी,तंबाखू,गुटखा,सुपारी,सिगारेट,दारू,स्टिंग कोल्ड्रिंक्स,अशा गोष्टीपासून दूर राहून आहारामध्ये पिझ्झा,बर्गर,वडापाव टाळून त्या ऐवजी दूध,केळी,चिकू,सफरचंद,पालेभाज्या,भाकरी,ओले शेंगदाणे घेऊन शरीर सशक्त सुदृढ आणि निरोगी ठेवले पाहिजे तसेच बुद्धी आणि बल याची सांगड घातली तर जीवनात यशस्वी होता येते आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज अर्धा तास व्यायाम करावा असे सांगून आपल्या देशातील तरुण पिढीच्या मानाने ऑलिंपिकमध्ये खूपच कमी मेडल मिळतात याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर यांनी केले तर प्रा गणेश भुसे यांनी आभार मानले याप्रसंगी प्रा धनाजी गवळी,प्रा गोविंद गायगोपाळ,प्रा दादासाहेब देवकर,प्रा धनंजय मेहेर,प्रा गणेश जोरवर यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते.