मंगळवेढा (प्रतिनिधी):-
मारापुर येथील माजी उपसरपंच ह.भ.प. तुकाराम तुळशीराम यादव यांचे आज दि.18/06/2025 रोजी सकाळी 11:20 वाजता अल्पशा आजाराने वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर मारापुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.दिनांक 20/06/2025 रोजी सकाळी 7:00 वाजता स्मशानभूमीत अस्थी विसर्जन होणार आहे.
मृत्युसमयी त्यांचे वय 83 वर्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मारापुर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब तुकाराम यादव यांचे ते वडील होते.