मंगळवेढा पंढरपूर हरित पालखी महामार्गावर दोन मोठ्या झाडांची वृक्षतोड

मंगळवेढा पंढरपूर हरित पालखी महामार्गावर दोन मोठ्या झाडांची वृक्षतोड

मंगळवेढा/ प्रतिनिधी :- 

मंगळवेढा पंढरपूर हरित पालखी महामार्गावरील मंगळवेढा पंढरपूर रोडवरील बस थांब्या जवळ असलेल्या पन्नास फूट उंच असलेली दोन वडाची झाडे शुक्रवारी रात्री तोडन्यात आली आहेत याबाबत संताप व्यक्त होत असून संबधित विभागाने याचा छडा लावून कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे वारी परिवाराने केली आहे.
सहा वर्षापूर्वी मोठा प्रोजेक्ट म्हणून हा कार्यक्रम राबवण्यात आला होता ही झाडे लहान असताना उन्हाळ्यात वारी परिवाराने सदस्यांच्या वाढदिवसाला विकत पाण्याचे टँकर घेऊन ही झाडे तळहाताच्या फोडी प्रमाणे जपली होती मात्र अनेक जण आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी तसेच व्यावसायिक अडचण होते म्हणून ही झाडे तोडून टाकली आहेत.

 याबाबत माहिती मिळाल्यानंतर वारी परिवाराच्या वतीने ही पाहणी करून संबधित विभागाला माहिती दिली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व हभप शिवाजी मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व वारी परिवार यांच्या सहकार्यातून लावण्यात आलेल्या वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे याची त्वरित दखल घेऊन वृक्षतोड करणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी वृक्षप्रेमीच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे अशा आशयाचे निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशनला देण्यात आले जिल्हा पोलीस प्रमुख वृक्ष संवर्धन व पर्यावरण प्रेमी आहेत या विषयात लक्ष घालून कठोर कारवाई करतील ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे कारवाईकडे पर्यावरण प्रेमीचे लक्ष लागलेले आहे.

 यावेळी अजित जगताप, सुहास पवार,सतीश दत्तू,परमेश्वर पाटील,प्रफुल्ल सोमदळे,रतिलाल दत्तू,स्वप्निल फुगारे,आनंद निकम,स्वप्निल मोरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.