4 लाख 55 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
ढवळस येथील माण नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून त्याची वाहतूक करताना पोलिसांनी टेम्पो पकडून 4 लाख 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी अज्ञात चालक,मालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,यातील फिर्यादी पोलीस हवालदार श्रीमंत पवार हे अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने दि.31 मे रोजी रात्री 1: 40 वाजता मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना नाईट राऊंड चे पोलीस अंमलदार काळेल यांचा फोन आला व त्यांनी आम्हा फिर्यादीस सागितले की, ढवळस येथे स्मशान भूमी जवळ एक टाटा इंट्रा कंपनीच्या वाहनामध्ये अवैध रित्या वाळू वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाली आहे.
त्यामध्ये फिर्यादी मी स्वतः व पोलीस पथकासच ढवळस गावात गेलो असता गावातून एक वाहन त्याचे समोरील दोन हेडलाईट लाऊन आमच्या दिशेने येताना दिसले.आम्हाला त्याचा वाळू वाहतुकीचा संशय आल्याने आम्ही त्यास बाजूला थांबविले. त्यावेळी सदर वाहनावरील चालक हा अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला.
सदर वाहन पाहता ते एक टाटा इंट्रा कंपनीचे वाहन त्याचा आर टी ओ क्रमांक MH13 DQ 1538 असा होता. वाहनाचे पाठीमागील हौद्यात काय आहे हे पाहिले असता त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू असल्याची दिसली.त्याची अंदाचे 5 हजार 100 रुपये किंमतीची एक ब्रास वाळू व 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे एक टाटा इंट्रा कंपनीचे वाहन असा एकूण 4 लाख 55 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात चालक व वाहन मालक यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण अधि कलम प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.