सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
मंगळवेढा (प्रतिनिधी) : -
लक्ष्मी दहिवडी येथे काही एक न सांगता घरात येवून एका ३० वर्षीय महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मगळसुत्र हिसकावून घेत शरीराला स्पर्श करुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी बाळू रामा बनसोडे,दत्ता रामा बनसोडे, पोपट मारुती बनसोडे,अनिकेत नागन्नाथ माळी,स्वाती बान बनसोडे, जया नागन्नाथ माळी या सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील ३० वर्षीय फिर्यादी महिला दि.९ रोजी सकाळी ७ वाजता ही घरी असताना शेजारी राहणारे आरोपी यांनी हातात काठ्या घेवून फिर्यादीच्या घरात आले. त्यावेळी फिर्यादीने तुम्ही माझ्या घरात का आला आहे? असे विचारले असता त्यांनी काही एक न सांगता फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली,तसेच फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून घेतले.
त्यानतर फिर्यादीच्या टॉपला उजव्या हाताच्या दंडाजवळ धरुन फाडला. सर्व आरोपींनी फिर्यादीच्या शरीरास स्पर्श करुन लज्जा वाटेल असे कत्य केले. फिर्यादीच्या बोटातील अंगठी काढून घेतली व या सर्वानी बेडरुममध्ये ओढत नेवून कपाटातील रोख ५ हजार रुपये काढून घेतले. फिर्यादीने आरडा ओरड केल्यावर फिर्यादीचे सासरे व पती आले.यावेळी फिर्यादीला आरोपीने पकड़ून घराच्या समोरील पत्रा शेड मध्ये बांधून ठेवले व आरोपीने गॅसच्या पाईपने हातावर, पाठीवर, पोटावर मारहाण करुन जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दि.११ रोजी फिर्यादीस सोलापू येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.याचा अधिक तपास पोलीस हवालदार निंबाळकर हे करीत आहेत.