पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपी पतीस व सासूला पोलिसांनी केली अटक, मंगळवेढा न्यायालयाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी

पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपी पतीस व सासूला पोलिसांनी केली अटक, मंगळवेढा न्यायालयाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी


 मंगळवेढा /प्रतिनिधी :- 

सोडचिठ्ठी व पोटगीबाबत मंगळवेढा कोर्टात दाखल दाव्याचा राग मनात धरून घरासमोर येऊन मुलगी आरती ही नांदण्यास जात नसल्याने सासू विमल पाटील हिने आम्हास शिवीगाळ करून मुलगी आरतीस धरून ठेवले व जावई अमोल पाटील याने हातातील धारधार चाकूने पत्नी आरती च्या पाटीत,पोटात व कमरेत चाकू खुपसून गंभीर जखमी करून खून केल्याप्रकरणी विवाहितेची आई सोनाली चौगुले यांनी फिर्याद दिल्यानंतर मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात होता.

पती अमोल अंबादास पाटील, सासू विमल अंबादास पाटील (रा. ढेकळेवाडी) आरोपींना अटक करून मंगळवेढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मयताचा सासरा अंबादास पाटील (ढेकळेवाडी) हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना अटक केली नाही. याबाबत माहिती अशी,ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शनिवार पेठ मयताच्या माहेरी घरासमोर वाद होऊन घडली.

मयताच्या दीराकडून वहिनीचा भाव, आईविरोधात गुन्हा केला दाखल..

याच गुन्ह्यात परस्पर विरोधी फिर्याद बुधवारी रात्री दाखल करण्यात आली आहे, यामध्ये मृत आरतीच्या दिराने फिर्याद दिली असून, त्यांचे आई-वडील, भाऊ अमोल, चुलते राजाराम पाटील आणि दादा मेटकरी असे वहिणी आरती हिला नांदण्यास येणेकरीता समजावून सांगण्यास गेले होते. त्यावेळी भांडण झाले.

वहिणीचा भाऊ प्रसाद आणि तिची आई सोनाली यांनी फिर्यादीच्या वडिलांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तेथे असलेल्या विटा हातात घेऊन विटांनी डोकीत चेहऱ्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले आहे.

या प्रकरणी प्रसाद चौगुले व सोनाली चौगुले (रा. शनिवार पेठ, मंगळवेढा) यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अनिल पाटील यांनी दिली. त्यावरून परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.