मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
मागील आठवडाभरापासून मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात थंडी वाढली आहे. रात्री थंडीचा प्रभाव अधिक जाणवत असल्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. वाढलेल्या थंडीमुळे रात्री घराबाहेर पडणे टाळत आहेत.
तसेच मंगळवेढा तालुक्यातील ढवळस मध्ये सायंकाळी हवेत गारवा वाढत असल्याने सायंकाळपासूनच नागरिकांना गरम कपड्यांचा वापर करावा लागत आहे. दिवसभरापेक्षा रात्री अधिक प्रमाणात थंडी जाणवत आहे. त्यामुळे गावात ठिकठिकाणी शेकोटी पेटल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तसेच अधिकच्या थंडीमुळे रात्री रस्त्यांवरील गर्दीत घट होत आहे.
सायंकाळी वाढलेली थंडी सकाळपर्यंत कायम राहात आहे. पहाटेपासून सर्वत्र धुके पसरत आहे. अधिकच्या थंडीमुळे सकाळी फिरायला घराबाहेर पडणार्यांच्या संख्येतही घट झाली आहे. रात्रीप्रमाणे सकाळीही काही ठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत.
तसेच सकाळी नोकरी, काम, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणार्या नागरिकांना गरम कपड्यांचा वापर करावा लागत आहे. दुपारी हवेतील गारवा काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र दुपारी चारनंतर पुन्हा हवेतील गारवा वाढत आहे. तसेच किमान तापमानात वाढ अपेक्षित नसल्याने थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.