जनतेच्या आशीर्वादातून विकासाची व्याख्या आणखी गतिमान करणार- आ समाधान आवताडे ,आ समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ गावभेट सभांना दुसऱ्या दिवशीही मतदारांचा जोरदार प्रतिसाद

जनतेच्या आशीर्वादातून विकासाची व्याख्या आणखी गतिमान करणार- आ समाधान आवताडे 

 आ समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ गावभेट सभांना दुसऱ्या दिवशीही मतदारांचा जोरदार प्रतिसाद 

मंगळवेढा / प्रतिनिधी- 

माझ्या तीन वर्षाच्या आमदारकी कालखंडात ऐतिहासिक निधीच्या रूपाने हजारो कोटींची विकास कामे मार्गी लागली आहेत शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचे मृगजळ शोधणाऱ्या या मतदारसंघातील जनतेला विकासात्मक परिवर्तनाचे चित्र दाखवू शकलो. त्यामुळे उर्वरित विकास कामांच्या क्रांतीसाठी जनतेच्या आशीर्वादातून विकासाची ही व्याख्या आणखी गतिमान करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मला आशीर्वाद देण्यासाठी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून माझ्याप्रती आपले प्रेम कायम ठेवा अशी साद आमदार समाधान आवताडे यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान घातली आहे.
भाजपा मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी भाजपा महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी मंगळवेढा तालुक्यातील हिवरगांव, खोमनाळ, भाळवणी, निंबोणी, चिक्कलगी, मारोळी, शिरनांदगी, सिद्धनकेरी, जालिहाळ, हाजापूर, डोंगरगाव, रड्डे या गावांमध्ये प्रचार सभा घेऊन संबंधित गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला व सदर गावभेटीदरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत, अशी उमेदवार आ आवताडे यांनी मतदार बंधू-भगिनींना विनंती केली.
गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघामध्ये प्रलंबित असणाऱ्या विविध विकास कामांना गती देऊन नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी ठरलेले लोकप्रतिनिधी म्हणून भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी आम्ही आपापसातील स्थानिक पातळीवरील गट-तट अथवा इतर राजकीय भूमिका बाजूला ठेवून त्यांच्या विजयासाठी एकजुटीची वज्रमूठ निर्माण करून प्रत्येक गावातून मोठे मताधिक्य देऊ असा निर्धार आणि विश्वास आणि ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केला आहे.

सदरप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजाराम कालिबाग, सरपंच बिरुदेव घोगरे, सरपंच शिवाजी सरगर, आदी मान्यवरांसहया प्रसंगी सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, चेअरमन भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.