तीन वर्षात केलेल्या विकास कामांचे जोरावर जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी- आ समाधान आवताडे, भाजपा-महायुतीचे उमेदवार आवताडे यांच्या प्रचाराचा माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ

तीन वर्षात केलेल्या विकास कामांचे जोरावर जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी- आ समाधान आवताडे

भाजपा-महायुतीचे उमेदवार आवताडे यांच्या प्रचाराचा माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ

मंगळवेढा/ प्रतिनिधी :- 

गेल्या तीन वर्षात मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी आणून केलेल्या विकास कामांच्या जोरावर या निवडणुकीमध्येही मतदानाच्या रूपाने जनतेच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर मंदिर माचणूर या ठिकाणी करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

या शुभारंभप्रसंगी बोलताना माजी आमदार परिचारक म्हणाले की, आपल्या वैयक्तिक इगो अथवा राजकीय प्रतिष्ठेपेक्षा भाजपा पक्षाचा विचार आणि ध्येयधोरणे आमच्यासाठी महत्वाची आहेत. विचारांची पार्टी अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीचे व्यापक कार्य आणि सर्वसामान्यांप्रती असणारी सामाजिक तळमळ यांचा विचार करून आपण कोणत्याही राजकीय पक्षाची अभिलाषा न स्वीकारता दिलेल्या शब्दाशी पक्के राहून उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मतदार संघातील विविध सहकारी संस्थांना त्याचबरोबर गेली अनेक वर्ष विकासाच्या कंगोऱ्यातून प्रलंबित असलेल्या विकास कामांना कोणत्याही राजकीय भूमिकेचा स्वार्थ समोर न ठेवता निधीच्या रूपाने सढळ मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाशी पात्र राहून आपण या निवडणुकीमध्ये हिरारीने सहभागी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सदर प्रचार दौऱ्यामध्ये माचणूर, मुंढेवाडी, रहाटेवाडी, ब्रह्मपुरी, तामदर्डी, अरळी, सिद्धापूर, नंदूर, भालेवाडी, डोणज, बोराळे, या गावांमध्ये या प्रचार सभा पार पडल्या. येत्या २० तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या संख्येने मतरुपी आशीर्वाद द्यावे ही विनंती उमेदवार समाधान आवताडे उपस्थित सर्वांना केली. सदरप्रसंगी भाजपा महायुतीचे विविध पदाधिकारी, मान्यवरांसह महायुतीचे सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.