चौघान विरुद्ध गुन्हा दाखल
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
मंगळवेढा शहरातील कृष्ण तलाव परिसरात सरकारी जागेतील एका पत्राशेडमध्ये मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकून 9 हजार 850 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सतीश पांडुरंग चव्हाण, लक्ष्मण उर्फ तम्मा श्रीमंत चौगुले,महेश दिगंबर चव्हाण, रामा शंकर देवकर (सर्व रा. शरद कॉलनी ,शनिवार पेठ,मंगळवेढा) या चौघा विरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी, शहरातील शनिवार पेठेलगत असलेल्या कृष्ण तलाव शेजारील सरकारी जागेतील एका पत्राशेडमध्ये काही लोक गोलाकार बसून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळताच त्यांनी पोलिसांचे पथक पाठवून खात्री केली असता वरील चौघे आरोपी सदर जागेत गोलाकार बसून 52 पानी डावावर मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले.
यावेळी पोलिसांनी 9 हजार 850 रुपये रोख रक्कम जप्त केली. याची फिर्याद पोलीस कर्मचारी तेजस मोरे यांनी दिल्यावर वरील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार अँक्ट कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.