मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ व डोंगरगाव येथील वायरमनला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी

मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ व डोंगरगाव येथील वायरमनला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी 


मंगळवेढा (प्रतिनिधि) :-

मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील राजेंद्र नारायण कदम या वीजग्राहकास कायमस्वरूपी कनेक्शन बंद असल्याने नोटीस बजावणी करिता गेलेले महावितरणचे वायरमन अकिब मुलाणी व डोंगरगाव येथे अनधिकृत आकडा काढत असताना सागर कुंभार यांना शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राजेंद्र नारायण कदम रा.पाटखळ व आबा बापू झेंडे रा.डोंगरगाव यांच्याविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.एकाच दिवशी महावितरण ची वीज वसुली करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यामुळे वीज कर्मचारी संघटना मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सागर महादेव कुंभार वय 29 वर्षे सध्या रा. एकविरा माळ ,मंगळवेढा हे मंगळवेढा शहर शाखा कार्यालय येथे वायरमन म्हणून काम करीत असून दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेनेचे सुमारास मंगळवेढा शहर शाखा अंतर्गत येणारे डोंगरगाव गावातील बाबासाहेब यशवंत साखरे यांचे कायमस्वरूपी कनेक्शन बंद असल्याने त्याचे नोटीस बजावनी करीत त्याचे राहते घराचा शोध घेत डोंगरगावात गेले होते. दरम्यान आबा बापू झेंडे रा. डोंगरगाव यांचे घराजवळून जात असताना आबा बापू झेंडे यांनी तू आमचे घरावर टाकलेला आकडा का काढत आहेस तू आमचे घराचे पाठीमागे का जात आहेस असे म्हणून अडथळा आणून शिवीगाळ केल्याप्रकरणी आबा बापू झेंडे याने सरकारी कामात अडथळा आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून आबा झेंडे यांचे विरुद्ध सागर कुंभार यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत फिर्यादी अकीब मुलाणी वय 22 वर्ष बह्यास्त्रोत कर्मचारी असून शाखा कार्यालय आंधळगाव अंतर्गत पाटखळ येथे कार्यरत आहे. ज्या ग्राहकांची कायमस्वरूपी कनेक्शन बंद असलेल्या पाटखळ गावातील नोटीसाची बजावणी करीत असताना राजेंद्र नारायण कदम यांचे कायमस्वरुपी कनेक्शन बंद असल्याने त्याचे नोटीस बजावनी करिता त्यांचे राहते घरासमोर दुपारी 3:00 वाजता फिर्यादी गेले.त्यावेळी राजेंद्र नारायण कदम यांना घरातून बाहेर बोलावून घेतले व त्यांना तुमचे कायमस्वरूपी कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे त्याची नोटीस तुम्हाला देण्याकरिता आलो आहे ती घ्या असे म्हणालो असता राजेंद्र नारायण कदम याने वायरमन मुलाणी यांना तुम्ही आमचे घरी कश्याला आलेला आहे तुम्ही येतून निघून जावा मी नोटीस घेणार नाही असे म्हणून शिवीगाळ करू लागला त्यावेळेस मी त्यांना तुम्ही मला शिवीगाळ करू नका असे समजावून सांगत असताना त्याने सरकारी कामात अडथळा आणून तुला आत्ता जिवंत ठेवत नाही असे म्हणून हातात दगड घेऊन डावे बरगडीवर मारून मुक्का मार दिला असल्याची फिर्याद मुलाणी यांनी दिली असून राजेंद्र कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.