मंगळवेढा/ प्रतिनिधी: -
माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देवेंद्र कोठे यांचे पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्याचे सांगण्यात आले.
देवेंद्र कोठे हे दोन वेळा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याने कायमची चर्चा होत राहते ते थेट नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे महेश कोठे यांना हा धक्का मानला जात आहे.
देवेंद्र कोठे हे भाजपमध्ये गेल्याने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना बळ मिळाल्याचे बोलले जाते. देवेंद्र कोठे यांची याप्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.