सोलापुरातील वस्त्रोद्योजक भाजपाच्या पाठिशी,नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राम सातपुतेंना विजयी करण्याची ग्वाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत चादर व टॉवेल उद्योजकांची बैठक...

सोलापुरातील वस्त्रोद्योजक भाजपाच्या पाठिशी

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राम सातपुतेंना विजयी करण्याची ग्वाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत चादर व टॉवेल उद्योजकांची बैठक

मंगळवेढा /प्रतिनिधी:-

सोलापुरातील वस्त्रोद्योजक भाजपाच्या पाठिशी खंबीर असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याची ग्वाही सोलापुरातील चादर आणि टॉवेल उत्पादक उद्योजकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिली. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांसोबत पेंटप्पा गड्डम यांच्या जे. जे. प्रा. लिमिटेडच्या कारखान्यात भेट घेऊन संवाद साधला. यावेळी आमदार सुभाष देशमुख हे देखील उपस्थित होते.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. स्टार्ट अप आणि स्टॅंड अपच्या माध्यमातून नव उद्योजकांना उद्योगासाठी प्राधान्य दिले आहे. याचा सोलापुरातील नवउद्योजकांना लाभ झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी सोलापूरमधील वस्त्रोद्योजक खंबीरपणे उभे असून सोलापूरमधून आमदार राम सातपुते प्रचंड मतांनी विजयी होतील, अशी ग्वाही पेंटप्पा गड्डम आणि इतर उद्योजकांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.