पंढरपुरात खा.शरदचंद्र पवार यांची उद्या जाहीर सभा

पंढरपुरात खा.शरदचंद्र पवार यांची उद्या जाहीर सभा

मंगळवेढा /प्रतिनिधी:-

महाविकास आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे उद्या दि .26/04/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता ,छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) पंढरपूर येथे मोठ्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविकास आघाडीचे नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
उद्या दिवसभर माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा होणार आहेत.या पंढरपूर येथील सभेसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सह महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सोलापूर आणि माढा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.