पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सोलापूरात जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सोलापूरात जाहीर सभा

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार, २९ एप्रिल रोजी  सकाळी ११ वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

भाजप आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. सोलापूर शहर मध्यसह सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर - मंगळवेढा तसेच मोहोळ या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे कॉर्नर बैठका, गाव भेटी, लाभार्थ्यांशी संवाद मतदारांच्या भेटी सुरू आहेत. यावेळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोलापूरसह देशाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्धार मतदार वर्गातून व्यक्त होत आहे.

याच प्रचाराचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन सोमवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरातील होम मैदान येथे करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर शहर जिल्ह्यासह देशाच्या विकासाचे व्हीजन ऐकण्यासाठी सोलापूरकरांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.