महादेव जानकर आता महायुतीसोबतच ...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिला महायुतीला पाठिंबा



महादेव जानकर आता महायुतीसोबतच ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिला महायुतीला पाठिंबा

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

महायुतीने शरद पवार यांना पुन्हा एकदा दे धक्का दिला असून महादेव जानकर यांची महायुतीसोबत दिलजमाई झालेली आहे. जानकर आता महाविकास आघाडी नव्हे तर महायुतीसोबत राहणार असल्याने महायुतीमधील एक जागा जानकर यांना मिळणार आहे.

याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली आणि महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.