सिद्धापूर सरपंचपदी लक्ष्मीबाई कोळी यांची निवड
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
सिद्धापूर तालुका मंगळवेढा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई महादेव कोळी यांची निवड करण्यात आली.
श्री मातुलिंग देवस्थानच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिद्धापूर नगरीत या गावचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बापूराव चौगुले, मार्केट कमिटीचे संचालक गंगाधर काकणकी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता अबाधित असून आ.समाधान आवताडे यांच्या माध्यमातून सिद्धापूर गावासाठी अल्पकाळात कोट्यावधीचा निधी मिळाला असून अनेक विकास कामे होत आहेत.
या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी सरपंच लक्ष्मीबाई निंगाप्पा नांगरे यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिला होता. यानंतर सत्ताधारी गटाकडून ठरल्याप्रमाणे शबाना रसूल मुलाणी यांना सरपंच पदाचा बहुमान मिळाला, मुलाणी यांनीही ठरलेल्या कालावधीनुसार सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मीबाई महादेव कोळी यांची निवड करण्यात आली, या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून ठरल्याप्रमाणे येत्या जानेवारी 2025 मध्ये युवा नेते गोटू पुजारी यांच्या मातोश्री निर्मला महादेव पुजारी यांनाही सरपंच पदाचा मान मिळणार असल्याचे या वेळी नेते बापूराया चौगुले व गंगाधर काकणकी यांनी बोलताना सांगितले.
गावासाठी निधी आणण्यात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांनी सततचा पाठपुरावा ठेवल्यामुळे यश आले. सिद्धापूर ग्रामपंचायतिच्या चालू पंचवार्षिक काळात माजी सरपंच लक्ष्मीबाई निगाप्पा नांगरे व सरपंच शबाना रसूल मुलाणी यांनी आपल्या कार्यकाळात गावासाठी आदर्शवत असा कारभार केला.
सरपंच शबाना रसूल मुलाणी यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या या सरपंच पदासाठी 19 मार्च रोजी सिद्धापूर सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी गटाकडून लक्ष्मीबाई महादेव कोळी तर विरोधी गटाकडून भारती कोळी यांचा अर्ज दाखल झाला होता. यामध्ये विरोधी गटाकडे पुरेशा सदस्य संख्याबळ नसल्याने सत्ताधारी गटाच्या लक्ष्मीबाई कोळी यांना सरपंच पदाचा बहुमान मिळाला आहे.
याप्रसंगी नेते बापूराव चौगुले, मार्केट कमिटीचे संचालक गंगाधर काकणकी, ज्येष्ठ नागरिक ओग्याप्पा मलकारी, धर्याप्पा भरमगोंडे, आर बी सी इंग्लिश मीडियमचे संस्थापक गजानन पाटील, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश पवार,शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नानासो मलगोंडे,सिद्राया चौगुले, माजी चेअरमन सुधाकर पाटील, मार्केट कमिटीचे माजी संचालक तिपणा सिंदखेड, माजी सरपंच रसूल मुलाणी,उपसरपंच भिमराया सिंदखेड, ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले, युवा नेते सागर खबाले,राजू तळे, माजी सरपंच नागनाथ कोळी, दयानंद कोळी, मुबारक मुलाणी, अनिल पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मनगोंड,कल्लाप्पा म्हेत्रे,गजानन चौगुले, बाबासाहेब नांगरे, बसवराज नांगरे, अण्णासो पाटील, नेमाण्णा पाटील, संतोष पाटील,ओके पाटील, महेश पुजारी, अमोगसिद्ध काकणकी, शिवानंद घाडगे, किसन घाडगे, सिद्धाराम मेडीदार, बसवराज सिंदखेड, महादेव कोळी, कल्लाप्पा पाटील, परशुराम कोळी, एमके कोळी, सिद्धाराम कोळी, सचिन कोळी, संतोष कोळी, इरफान मुलाणी,भीमराव गोंधळी, चंद्रकांत कोळी, महेश कसुरे, रमेश भरमगोंडे,आर के तोरवी,संतोष तळे, अण्णाप्पा काकणकी, प्रज्वल मलकारी, गंगाधर तळे,सिद्धाराम म्हेत्रे, राजेंद्र लाड, महेश काकणकी, सैफन शेख,राजकुमार नांगरे, गंगाधर भरमगोंडे, संजय कुन्हाळे, रामचंद्र पुजारी, राकेश कपले, सद्दाम इनामदार,श्रीकांत तळे,ईश्वर भजनावळे, मल्लिकार्जुन वाघमारे, किरण घाडगे,तमन्ना पुजारी, शरणाप्पा कोळी
सिद्धारया कोळी, अहमद मुलाणी, बुडा मुलाणी यांच्यासह सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच पदाच्या निवडीनंतर गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. नूतन सरपंच लक्ष्मीबाई महादेव कोळी यांचा नेते बाबुराया चौगुले व मार्केट कमिटीचे संचालक गंगाधर काकणकी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.