मंगळवेढा (प्रतिनिधी) -
शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने संघाचे संस्थापक-माजी अध्यक्ष संपादक दिगंबर भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पत्रकार संघाचे अध्यक्ष भिमराव मोरे यांच्या संकल्पनेतून मोरे फार्म हाऊस पाटकळ येथे रंगपंचमी सणानिमित्त नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण करून इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव हे आवर्जून उपस्थित होते.
निरनिराळ्या रसायन युक्त रंगाच्या वापरामुळे शारीरिक व नैसर्गिक गोष्टींना मोठी हानी पोहचून सजीवांचे जीवनमान धोक्यात येण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व निसर्गाचे संतुलन या बाबींवर सखोल विचारसरणीचा अवलंब करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी विविध मान्यवर, दामाजी न्यूजचे सर्व निवेदक व ग्रामस्थांनी एकमेकांना रंग लावून होळी व रंगपंचमी सणाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडत असताना संयोजक भिमराव मोरे यांनी सांगितले की, शाहू अभिजित मोरे सामाजिक संघटना व मोरे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विविध सणांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. आतापर्यंत गरजूंना ब्लॅंकेट वाटप, जेष्ठ मंडळींना काठी व टोपी-वाटप, गरजू मुलांना चप्पल शैक्षणिक- साहित्य, रक्षाबंधन व नागपंचमी सणाला महिला-भगिनींना साडी-चोळी व खण, नूतन पत्रकार पदाधिकाऱ्यांचे व विविध क्षेत्रातील गुणवंतांचे सत्कार, उन्हाळ्यात सामाजिक बांधिलकी उराशी ठेवून चिमण्यांना व इतर पक्षांना पाणपोई आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
या कार्यक्रमासाठी नागेश आवताडे, शिवाजी शिंदे, मल्हारी पवार, जयंत पाटील, तात्यासाहेब कोळी, दामाजी न्यूज सीईओ प्रतिक भगरे, युवा उद्योजक अभिजित मोरे, बालाजी टुले, संतोष मिसाळ आदी मान्यवर व इतर पत्रकार तसेच स्थानिक ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागतपर मनोगत निवेदक भारत दत्तु व सुलेमान तांबोळी यांनी मांडून सर्वांचे स्वागत केले व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक राजेंद्रकुमार जाधव यांनी केले तर निवेदक वासुदेव जोशी यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.