स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन या संस्थेचे माजी जेष्ठ संचालक स्व. महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान, मंगळवेढा यांनी दिली आहे.

या कार्यक्रमामध्ये सोमवार दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता नामवंत कीर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर यांचे सुश्राव्य अशी किर्तन सेवा संपन्न होणार आहे. व त्यानंतर दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी पुष्पवृष्टी व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सर्व नियोजित कार्यक्रम आमदार समाधान आवताडे जनसंपर्क कार्यालय खंडोबा गल्ली मंगळवेढा येथील प्रांगणात संपन्न होणार आहेत. तरी वरील कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा चेअरमन बबनराव आवताडे, श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, आमदार समाधान आवताडे, आवताडे शुगर अँड डिस्टिलर चे चेअरमन संजय आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे व आवताडे परिवारातील इतर सदस्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.